Wednesday, July 9, 2025

६९० निधानसभा जागांवर होणार निवडणूका,सात टप्प्यात रंगणार महासंग्राम

६९० निधानसभा जागांवर होणार निवडणूका,सात टप्प्यात रंगणार महासंग्राम
दिल्ली : ६९० निधानसभा जागांवर निवडणूका होणार असल्याचं आज मुख्य निवडणूक आयोग सुशील चंद्र यांनी पत्रकार परिषदेते स्पष्ट केलं.  उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड या राज्याच्या निवडणूका पार पडणार आहेत. पाच राज्यांच्या निवडणूका सात टप्प्यात होणार आहेत. तर पाचही राज्यात १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

कोरोना काळात निवडणूका घेणे आव्हानात्मक असल्याचंदेखील मुख्य निवडणूक आयोगांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. या निवडणूकीत एकूण १८ कोटी ३० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार. तर २४.९ लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी महिल्यांसाठी १ हजार ६२० मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.

वेळेवर निवडणूका घेणे ही आमची जबाबदारी होती. प्रत्येक निवडूक केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे. तसंच कोरोना काळात नियमांचं पालन करून निवडणूका पार पडणार असल्यांचं देखील मुख्य निवडणूक आयोगांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

गोवा आणि मणिपूरच्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा 25 लाख रुपये तर पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडत्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा ४० लाख असेल तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती घोषित करावी लागेल असंदेखील यावेळी सुशील चंद्र यांनी सांगितलं

यंदाच्या निवडणूकीत कोरोनामुळे पाचही राज्यांच्या मतदानाच्यावेळेत एक तासाची वाढ करण्यात आलीय.

तसंच सोशल मीडियावरून जास्तीत जास्त प्रचार करावा असं आवाहन यावेळी मुख्य निवडणूक आयोगांनी केलंय. 15 जानेवारीपर्यंत कुठल्याही प्रकारची रॅली काढण्यात येणार नाही. सर्व प्रकारच्या रॅलीवर निवडणूक आयोगांकडून बंदीची घोषणा करण्यात आलीय. रोड शो, रॅली, बाईक रॅली, पदयात्रा, काढता येणार नाही आणि डोअर टू डोअर प्रचार करताना पाचपेक्षा अधिक जणांना परवानगी नसणार असंहीदेखी ते यावेळी म्हणाले.

उत्तर प्रदेश निवडणूकीचा पहिला टप्पा १० फेब्रुवारीला आणि दुस-या टप्पा १४ फेब्रुवारीला , तिसरा टप्पा २०  फेब्रुवारीला असेल . पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात निवडणूका होणार आहेत तर पाचही राज्यात १० मार्चला मतमोजणी होणार आहे. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदाना पार पडणारेय आणि १० मार्चला मतमोजणी होणार आहे. गोव्यात उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी असेल.

मणिपूरमध्ये निवडणूकीचा पहिला टप्पा 27 फेब्रुवारी, आणि दुसरा टप्पा ३ मार्च असेल.
Comments
Add Comment