Saturday, August 16, 2025

पोलीस कर्मचारी वाढवण्याची मागणी

पोलीस कर्मचारी वाढवण्याची मागणी

बदलापूर  : बदलापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शहरातील पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेला मंजूर कर्मचारी फक्त १२२ असून सध्या १०५ पोलीस कर्मचारी तैनात आहेत,


तर पश्चिमेला मंजूर कर्मचारी ५० असून सध्या ७० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांवरच ताण पडत आहे. बदलापुरात दिवसासुद्धा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच करोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे बदलापुरातील पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांसह नवीन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >