Sunday, June 8, 2025

डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस रद्द

पुणे  :  ठाणे आणि कळवा या धीम्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ९ जानेवारी रोजी सुटणारी डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेकडून १० जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 9 जानेवारी रोजी सुटणाऱ्या मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई - गदग एक्स्प्रेस यांसह अन्य ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.



तर, हुबळी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे.

Comments
Add Comment