
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. दानवे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ट्वीट करून याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. दानवे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लक्षणं जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत असून सध्या स्वत:ला आयसोलेशन करून घेतलं आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. साहेब लवकर बर व्हा - सदाभाऊ खोत दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी यावर ट्वीट करत म्हटले आहे की, साहेब लवकर बर व्हा. राज्यातील जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव आपल्या पाठिशी आहे.