Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

भाजपा आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपा आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, : माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली आहे. या तक्रारीत शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने शेलार यांनी दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती पोलिसांना केली आहे. याबाबत आज, शनिवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहून आमदार शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देणार आहेत. याआधी एकदा गेल्या वर्षी अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती. तेव्हा धमकी देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती.

Comments
Add Comment