Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

राज्यातली नवी नियमावली जारी

राज्यातली नवी नियमावली जारी
मुंबई : उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू कऱण्यात आले आहेत.  रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू करण्यात आलाय. तर सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. तसंच  राज्यातल्या शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद राहणार. सलून खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार. स्विमिंग पूल, जीम, स्पा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच  २ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार आहे. लग्न कार्यासाठी ५० तर अत्यंविधीसाठी २० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
Comments
Add Comment