
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अद्याप चकमक सुरु असून आणखी काही दहशतवादी लपून बसले असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.
काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ते जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.
https://twitter.com/ANI/status/1479300659337854978?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1479300659337854978%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fthree-terrorist-killed-in-kashmir-by-security-forces-ssy93
बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी रात्री चकमक सुरु झाली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात जोलवा गावात शोधमोहिम सुरु केली होती. त्यात दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यानतंर प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलाने गोळीबार केला. एकजण श्रीनगरमधील असून वसिम असे त्याचे नाव आहे.
याआधी पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. ते तिघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित होते आणि त्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता.