मुंडन आंदोलन करून कामगारांनी कंपनी प्रशासनाचा केला निषेध

  85

वाडा :  कोकाकोला कंपनी प्रशासन व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी बुधवारपासून वाडा तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या झेंड्याखाली बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्याने तिसऱ्या दिवशी सकाळी कामगारांनी मुंडन आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, उप सहाय्यक आयुक्त, कंपनी प्रशासन, कामगार नेते व कामगार यांची शुक्रवारी दुपारी तहसीलदारांनी बोलवलेल्या बैठकीत मागण्यांबाबत एकमत न झाल्याने बोलणी फिस्कटली.त्यामुळे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.

तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शितपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत स्थानिक भुमिपूत्र कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.कंपनी प्रशासन व ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरु असून ठेकेदाराने कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार ५ जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र दुसऱ्या दिवशीही कंपनी प्रशासन किंवा कामगार आयुक्त प्रशासन या आंदोलनाकडे फिरकले नाहीत.त्यामुळे कंपनी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी सकाळी कामगारांनी आंदोलनस्थळीच मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

दरम्यान,आज दुपारी निवासी नायब तहसीलदार सुनील लहांगे यांनी कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक रूपेश परदेशी, संदीप वेखंडे, ठेकेदार धनंजय चौधरी, उप सहाय्यक आयुक्त दिपक बोडके,पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, संघटनेचे नेते जितेश पाटील, रविंद्र मेणे व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मागण्यांबाबत कामगारांत एकमत न झाल्याने बोलणी फिस्कटली त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
Comments
Add Comment

Sanjay Shirsath : पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

मुंबई : महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांच्या एका व्हायरल व्हिडिओने सगळीकडेच खळबळ माजली आहे. नुकतीच मंत्री संजय

मुंबईत बेस्ट बसेसची संख्या १० हजारांपर्यंत वाढवण्याची योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात माहिती

मुंबई : मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर ६,५५५ बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार केला आहे.

Medical College : 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

अहिल्यानगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातचं होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं

Nitesh Rane : ‘मुंबईचा डीएनए हिंदूंचा, महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार…’, नितेश राणे यांचा ठाम विश्वास

मुंबई : नितेश राणे यांच्या हस्ते ‘बोरीवली रो-रो जेट्टी (फेज १)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन आज सकाळी

आता वेळेत पूर्ण होणार मुंबई मेट्रोची कामे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. एमएमआरडीए हणजेच मुंबई महानगर

गोठवलेल्या बँक खात्यांतील पैसे खातेदारांना लवकर मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात