
वाराणसीमध्ये आयोजित कॉयर फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या नारायण राणे यांनी, काशीमध्ये कॉयर उद्योगाचे चार मोठे शोरूम उघडतील. यामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल, असे सांगितले. काशीमध्ये लघु उद्योगाला चालना देण्यासाठी आता लोकांना अनुदानावर मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच कच्चा मालही दिला जाईल, जेणेकरून लोक तागाचा माल बनवून स्वयंपूर्ण होतील. त्यामुळे लघु उद्योगाला चालना मिळेल, असे नारायण राणे यांनी पुढे म्हटले.
महाराष्ट्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी
महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनबाबत तेथील सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचे नारायण राणे यांनी पुढे सांगितले. त्यामुळेच लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. कारण, तेथील आघाडी सरकार कोरोना विषाणूचा आणि राज्य दोघांनाही सांभाळू शकत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.