राजापूर :गावच्या आणि तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचा विचार करून रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव ग्रामसभेत पारित करून विकासाची कास धरणारे गोवळ गावचे सरपंच अभिजित कांबळे यांचे भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले. गोवळ गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे नमूद करत मी तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही निलेश राणे यांनी सरपंच कांबळे आणि ग्रामस्थांना दिली.
गोवळ गावच्या विविध विकास कामांबाबत बुधवारी गोवळ सरपंच अभिजित कांबळे, मेघराज सावंत व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांची रत्नागिरीत भेट घेतली. यावेळी कांबळे यांनी गावातील काही विकासकामांना निधी मिळावा याबाबत राणे यांच्याशी चर्चा केली व याबाबतचे एक निवेदन राणे यांना दिले.
यावेळी निलेश राणे यांनी कांबळे व गोवळ ग्रामस्थांचे अभिनंदन केले. गोवळ गावच नव्हे तर राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यासह राज्य आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून तसा ठराव ग्रामसभेत पारित केल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन केले. गोवळ गावच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करूच असे सांगताना कधीही हाक मारा मी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाहीही राणे यांनी यावेळी दिली.