Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीगृह विलगीकरणासाठी महापालिकेची नवीन नियमावली

गृह विलगीकरणासाठी महापालिकेची नवीन नियमावली

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, २० हजारांचा टप्पा देखील कोरोना रुग्णांनी पार केला आहे. त्यामुळे आता भीती जास्तच वाढली असून आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान पालिकेने दिवसाला २५ हजार बेडची तयारी ठेवली असली तरी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलीच लक्षणे दिसत नाहीत, असे रुग्ण गृह विलगीकरणात राहत आहेत, मात्र त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. रुग्णांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान महापालिकेच्या नियमावलीनुसार ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे असतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, शिवाय ताप नसेल व ऑक्सिजन पातळी देखील नॉर्मल असेल, अशा रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यास महापालिकेची परवानगी असणार आहे, तर अशा रुग्णाला स्वतः शिवाय आपल्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना देखील गृह विलगीकरणात राहण्याची सोय असावी, तसेच जे रुग्ण ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील आहेत किंवा जे रुग्ण मधुमेह, हायपर टेन्शन, हृदयाचा आजार, किडनीचा आजार असे आहेत, अशा रुग्णांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतरच गृह विलगीकरणात राहण्याची परवानगी दिली जाईल,

तसेच परवानगी नसल्यास त्यांना गृह विलगीकरणात उपचार घेता येणार नाही व ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल किंवा एचआयव्ही, कॅन्सर थेरपीसारख्या आजारातून जात असेल, अशा रुग्णांना गृह विलगीकरणासाठी परावनगी नसेल, तर आरोग्य अधिकारी, डॉक्टरांनी अशा रुग्णाला तपासल्यानंतर जर गृह विलगीकरणात राहण्याची परवानगी दिली, तरच अशा रुग्णाला गृह विलगीकरणमध्ये राहता येणार आहे.

तर गर्भवती महिलांसाठी देखील नवीन नियम असणार आहेत, ज्या गर्भवती महिलेची बाळंतपणाची अपेक्षित तारीख दोन आठवड्यांवर आहे, अशा रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवता येणार नाही, विशेष म्हणजे गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःला घरातील एका खोलीमध्ये आयसोलेट करायचे आहे. इतर कुटुंबातील सदस्यांच्या, वयोवृद्ध व कॉमॉरबीडिटी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणे काटेकोरपणे टाळायचे आहे. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने ट्रिपल लेअर किंवा एन ९५ मास्कचा वापर करावा व दर आठ तासाने मास्क बदलावे. कोणत्याही वस्तू शेअर करू नयेत, इतरांच्या वस्तू वापरू नयेत, तर स्वतःहून शरीराचे तापमान सोबतच ऑक्सिजनची पातळी तपासावी. गृह विलगीकरणात कोरोना पॉझिटिव्ह

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -