Sunday, October 19, 2025
Happy Diwali

बायको, मुलीकडून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या

कल्याण: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे (५५) यांची हत्या करण्यात आली आहे. बोरसे यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक हिरा पन्ना अपार्टमेंट येथे प्रकाश बोरसे हे आपली पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री सोबत राहत होते. धक्कादायक म्हणजे खलबत्त्याने ठेचून दोघींकडून ही हत्या करण्यात आली. भाग्यश्री हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र ती सासरी नांदत नसल्याने बोरसे यांच्या घरात नेहमी वाद होत होते, त्यातूनच ही हत्या झाल्याचा आरोप आहे. दोघी मायलेकींना कोलशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा