मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधुवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आज नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावनी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना 11 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना ‘म्याँव म्याँव’ करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं आणि सरकारचा दबाव असल्यानं या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अटकपूर्व अर्जातून केलेला आहे.
.