भिवंडी : भिवंडी ग्रामीण भागात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
गुरुवारी सायंकाळी दापोडा ग्रामपंचायत क्षेत्रात मोजे बनविणाऱ्या सॉक्सक्को या कारखान्यास आग लागण्याची घटना घडली असतानाच मध्यरात्री नंतर पहाटे मुंबई नाशिक महामार्गावर वडपे ग्रामपंचायात हद्दीत एका फर्निचर बनविणाऱ्या लाकूड कंपनीमध्ये आग लागण्याची घटना घडली.
मध्यरात्री नंतर सुमारे पावणे दोनच्या सुमारास मेहंदी हसन चौधरी यांच्या मालकीच्या एका प्लायवूड व लाकडाचे ओंडके असलेल्या गाळ्याला आग लागल्याची घटना घडली. यावेळी गोदामात झोपलेले रिंकूराज नारायण, (वय २४), राजगौतम विश्वकर्मा (वय २२) हे दोन कामगार अडकून पडले होते. स्थानिक नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही कामगारांना भाजलेल्या जखमी अवस्थेत बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. या आगीवर सकाळी ९ च्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
तर दापोडा ग्रामपंचायात हद्दीतील मानस पेट्रोल पंपाजवळ पारसनाथ कॉम्प्लेक्स मधील एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…