अमृतसर : इटलीवरून भारतात परतलेले, संस्थात्मक विलगीकरणात असलेले १३ कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याची घटना अमृतसरमध्ये घडली आहे. यापैकी ९ जण विमानतळावरूनच पळाले असून ४ जण स्थानिक रुग्णालयातून पळून गेले आहेत. इटली ते भारत विमानप्रवास करून १६० जण भारतात बुधवारी परतले. त्यापैकी १२५ प्रवासी बाधित आढळले होते. बाधित प्रवाशांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
…
इटलीवरून आलेल्या १३ कोरोनाबाधितांचे पलायन
