Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीस्मॉल स्क्रीनवर एन्टरटेन्मेंटचा डबल धमाका

स्मॉल स्क्रीनवर एन्टरटेन्मेंटचा डबल धमाका

मुंबई : झी मराठी वाहिनी म्हणजे अस्सल मनोरंजन. या वाहिनीवरील मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षक आपलंस करतात आणि त्या  त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून जातात असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. येत्या रविवारी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड सादर करणार आहे. इतकंच नव्हे तर ३ ऐवजी ४ मालिकांचे महाएपिसोड प्रेक्षकांना येत्या रविवारी पाहायला मिळतील. मन उडू उडू झालं, किचन कल्लाकार, देवमाणूस आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या कार्यक्रमांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रसारित होतील.

मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्राने दिपूसमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या पण दिपू मात्र त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवते आहे. दिपूच ही इंद्रावर तितकंच प्रेम आहे याची जाणीव तिला होतेय. पण दिपू इंद्राला होकार देईल का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका मन उडू उडू झालं मालिकेचा १ तासाचा विशेष भाग संध्याकाळी ७ वाजता.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिड अमेरिकेला जाण्याबाबतचं त्याचं मत अदितीला सांगणार आहे. ते ऐकून अदिती अस्वस्थ होते. आता अदिती कुटुंब निवडेल की सिडसोबत अमेरिकेला जाण्यात्या त्याच्या स्वप्नात त्याला साथ देईल…? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेचा विशेष भाग रात्री ८ वाजता.

किचन कल्लाकारच्या विशेष भागात प्रेक्षकांना सलील कुलकर्णी, मुग्धा वैशंपायन आणि वैशाली म्हाडे यांची किचनमधील तारेवरची कसरत पाहायला मिळेल रात्री ९ वाजता.

देवमाणूस मालिकेत प्रेक्षकांची पाहिलं कि डॉक्टरला आता एक नवीन सावज मिळालं आहे. गावात आलेल्या कॉन्ट्रॅक्टरची बायको नीलम हिला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा डॉक्टर प्रयत्न करत आहे. अजित नीलमला वाड्यात घेऊन येतो. डिंपल त्याच्यावर नजर ठेवून आहे. वाड्यातील सर्व जण नीलमच्या खातिरदारीत व्यस्त असताना ती संधी साधून अजित डिंपल जवळचा पुरावा नष्ट करतो. पण डिम्पलला खात्री आहे कि नटवरने सलोनीचा खून केला आहे. त्यामुळे ती त्याचा पाठपुरावा करतेय. डिम्पल हे सिद्ध करू शकेल का कि नटवरच खुनी आहे. हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका देवमाणूस २चा १ तासाचा विशेष भाग रात्री १० वाजता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -