Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १३ जानेवारीला

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १३ जानेवारीला

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १३ जानेवारीला जिल्हा बँकेच्या आरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी बंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपच्या गोटात चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तय करणार आहेत याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी सतीश सावत यांचा पराभव करून शिवसेनेला धक्का देत निवडून आलेले विठ्ठल देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व मिळवल्यानंतर आता अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ जानेवारला दुपारी अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवलीत झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरण राज्यभर गाजले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. मात्र भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून होते. जिल्हा बँकेत १२ विद्यमान संचालकांना पराभव पत्करावा लागला होता.

भाजपचं वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.

कणकवलीतून भाजपचे विठ्ठ्ल देसाई विजयी झाले. समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून हा निकाल जाहीर झाला. यात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे गेल्यावेळी बिनविरोध निवडून आले होते. यंदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरीकडे भाजपचं वर्चस्व दिसत असले तरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. याठिकाणी वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक विजयी झाले.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत १९ जागांपैकी ११ जागा जिंकून भाजपने बाजी मारली. आठ जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -