Thursday, October 23, 2025
Happy Diwali

वैजनाथमधील अनधिकृत बांधकामांवर लवकर हातोडा

वैजनाथमधील अनधिकृत बांधकामांवर लवकर हातोडा

ज्योती जाधव

कर्जत : गेल्या अनेक महिन्यांपासून वादात अडकलेल्या वैजनाथ ग्रामपंचायत हद्दीमधील नदीच्या बाजूला केलेल्या अनधिकृत बांधकामांवर लवकर जेसीबी फिरविला जाणार असल्याची माहिती उपअभियंता भारत गुंटूरकर यांनी दिली आहे.

स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या संगनमताने नदीच्या बाजूला उभारलेल्या बंगल्याला नदीमुळे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित प्रशासनाची परवानगी न घेता बंगल्याच्या संरक्षणासाठी नदीमध्ये भिंत उभारण्याचे काम नाखवा यांनी केले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी पाटबंधारे विभागाकडे सतत पाठपुरावा केला आणि पाटबंधारे विभागाने पाहणी करून संबंधित मालकाला तीन वेळा नोटीस काढण्यात आली. तरीदेखील संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा न दिल्याने अखेर पंधरा दिवसात बांधकाम हटविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देण्यात येणार असून पोलीस बंदोबस्ताची मागणी करणार असल्याचे या वेळी उपअभियंता गुंटूरकर यांनी सांगितले. तसेच नाखवा यांनी नियमानुसार पूरनियंत्रणाची जागा सोडून बांधकाम करणे अपेक्षित असताना त्यांनी नदीमध्येच बांधकाम केल्याने ती भिंत तोडण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >