Monday, May 12, 2025

महामुंबईमनोरंजनरिलॅक्समहत्वाची बातमी

कोरोनामुळे बिग बजेट सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलली

कोरोनामुळे बिग बजेट सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलली








मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनामुळे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. सिनेमाचे निर्माते सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाची रिलीड डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगत आहेत. जर्सी, आरआरआर, राधे श्याम, पृथ्वीराज, वलिमै या सिनेमांचा या बिग बजेट सिनेमांचा यात समावेश आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 


शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय होऊ शकत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमा नेमका कधी रिलीज होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक माहिती देतील असं सांगण्यात येत आहे.


बाहुबली स्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) च्या 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  राधे श्याम सिनेमा येत्या 14 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. सिनेमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'राधे श्याम' सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे.


 एसएस राजामौलींची आगामी 'आरआरआर' सिनेमा 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'आरआरआर' सिनेमाच्या निर्मात्यांनी  ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्वीट शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"प्रेक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे". 


 
Comments
Add Comment