Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाआंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट नियमांमध्ये बदल

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट नियमांमध्ये बदल

निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करणे बंधनकारक

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनमध्ये बदल केला आहे.
या बदलातर्गत, गोलंदाजी संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करावा लागेल. संघ निर्धारित वेळेपेक्षा मागे राहिला, तर उर्वरित षटकांमध्ये, त्याचा एक क्षेत्ररक्षक ३० यार्डबाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला आत राहावे लागेल. अशा स्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला तोटा सहन करावा लागू शकतो. सध्या, पॉवरप्लेनंतर ३० मीटर यार्ड वर्तुळाबाहेर ५ क्षेत्ररक्षक असतात. मात्र नवीन नियमांनंतर केवळ ४ क्षेत्ररक्षक यार्डबाहेर राहू शकणार आहेत.

याशिवाय द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक डावात अडीच मिनिटांचा ऐच्छिक ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी सहमती दर्शवली तरच हे लागू होईल. टी-ट्वेन्टी क्रिकेटमधील बदलांशी संबंधित हे नियम वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या एकमेव सामन्यापासून लागू होतील. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १८ जानेवारीपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या महिलांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत नवीन नियम पहिल्यांदाच अमलात येईल.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या द हंड्रेड क्रिकेट लीग अर्थात ईसीबीमध्ये असा नियम यशस्वीपणे वापरल्यानंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सर्व फॉरमॅटमध्ये खेळाचा वेग सुधारण्यासाठी असे करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -