भंगार विक्रीतून मध्य रेल्वेची ३५०.८१ कोटींची कमाई

  72

मुंबई : प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त आहेत याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने शून्य स्क्रॅप मिशन सुरू केले आहे. या मोहिमेचा पाठपुरावा करून, भुसावळ विभागाने दि. ३.१.२०२२ रोजी आयोजित लिलावादरम्यान आजवरची सर्वाधिक एक दिवसीय भंगार विक्रीतून रु. १५.५३ कोटी मिळविले. मध्य रेल्वेने २०२१-२२ या वर्षात दि. ४ जानेवारी २०२२ पर्यंत ३५०.८१ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री केली आहे. मध्य रेल्वेने ३५,११९ मेट्रिक टन स्क्रॅप रूळांतून/परमनंट वे, ३५८ नग लोको, डबे आणि वॅगन्स या व्यतिरिक्त इतर फेरस आणि नॉन-फेरस भंगार वस्तूंची विल्हेवाट लावून हे साध्य केले गेले आहे. तसेच १६६ लाखांचे एकूण विक्री मूल्य असलेल्या ७३१ मोडलेल्या क्वार्टर्समधील भंगार स्पर्धात्मक दराने ई-लिलावाद्वारे विकले गेले आहेत.


मोडलेल्या संरचनेची जलद विल्हेवाट लावण्यासाठी आणि रेल्वे बोर्डाने दिलेले लक्ष्य पार करण्यासाठी व झिरो स्क्रॅप मिशन साध्य करण्यासाठी अतिरिक्त भंगार शोधण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यासाठी मध्य रेल्वे विद्यमान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे.


श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी सांगितले की, भंगाराच्या विक्रीमुळे केवळ महसूल मिळत नाही तर परिसराची देखभालही चांगली होते. त्यांनी असेही सांगितले की, मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये रेल्वेमधील विविध ठिकाणी शोधलेल्या सर्व भंगार साहित्याची विक्री करेल.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई