मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे बेस्ट उपक्रमाने दोन डोस घेतलेल्या बेस्ट प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या २० हजारांच्या पुढे गेल्याने मुंबईत सध्या चिंतेचे वातावरण आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत प्रवाशांनी दोन डोस घेतले आहेत का? याची तपासणी बेस्टतर्फे केली जात आहे.
सकाळी आणि सायंकाळी बेस्ट बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशावेळी बेस्टकडून युनिव्हर्सल पासची काटेकोर तपासणी केली जात आहे. दरम्यान अचानक बेस्टकडून युनिव्हर्सल पासची तपासणी केल्यामुळे प्रवासी गोंधळले आहेत. कुलाबा, वडाळा, मुंबई सेंट्रल या आगरासह इतर आहारातही तसेच गर्दीच्या बस स्टॉपवर लसीकरण तपासणी मोहीम सुरू केली आहे