Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीसिटी पार्कच्या कामाच्या दर्जाबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील असमाधानी

सिटी पार्कच्या कामाच्या दर्जाबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील असमाधानी

कल्याण : केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी अंतर्गत चाललेल्या कामांच्या पाहणीदौऱ्या करिता केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे कल्याण पश्चिममध्ये आले होते. स्मार्टसिटी अंतर्गत सिटीपार्कच्या कामाची पाहणी केली असता, सिटी पार्कच्या कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.


सिटी पार्कच्या कामाची गुणवत्ता आणि हे काम कोणासाठी आणि कशासाठी आहे हा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी संबंधित ठेकेदार आणि महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी तसेच पालिका अधिकारी यांच्याशी सल्ला-मसलत करून, सिटी पार्कच्या कामाचा दर्जा योग्यरीत्या व्हावा असे निर्देश दिले. आणि संत गतीने सुरू असल्याने कामावरही नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांसाठी सिटी पार्क लवकरात लवकर खुला व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र शासनाच्या निधीतून असलेल्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या कामांचा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आढावा घेतला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थिती बद्दल केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत देशभरातील महत्वाच्या शहरांना उत्तम व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. या अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार टाऊन पार्क व सिटी पार्क विकसित करणे, काळा तलाव व परिसराचे सुशोभीकरण, कल्याण स्टेशन परिसर सुधारणे अशी अनेक कामे सुरु आहेत. या कामांचा आढावा घेऊन त्यांची सद्यस्थिती काय आहे, कामे पूर्ण होण्यास येणारे अडथळे यांची माहिती मंत्री कपिल पाटील यांनी घेतली.


यावेळी कपिल पाटील यांनी कल्याण रेल्वे स्थानक, भगवा तलाव, सिटी पार्क (गौरीपाडा) तसेच वाडेघर सर्कल ते रिंग रोड ते बारावे- आंबिवली- टिटवाळा या ठिकाणी स्वतः पाहणी करून संपूर्ण माहिती घेतली. ही कामे योग्य वेळेत पूर्ण व्हावीत जेणेकरून आपण मोदीजींच्या स्वप्नातील स्मार्ट शहरे उभारू शकू, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -