Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीसीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे हस्तांतरण

सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे हस्तांतरण

संकल्प सिद्धी ट्रस्टचा वर्सोवा, ओशिवरा पोलिस स्थानकांतर्गत उपक्रम

मुंबई  : संकल्प सिद्धी ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र सचिव दिव्या ढोले यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून मुंबई पोलीस परिमंडळ ९ क्षेत्रातील वर्सोवा व ओशिवरा पोलीस स्थानकांतर्गत अति संवेदनशील ठिकाणांवर “सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व्हेलिअन्स यंत्रणा” लावून कार्यान्वित करण्यात आली आहे. संस्थेकडून या सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे अधिकृत हस्तांतरण मुंबई पोलीस परिमंडळ ९ चे उप आयुक्त मंजुनाथ शिंगे यांच्याकडे प्रकल्प दस्तावेज देऊन गुरूवारी ओशिवरा पोलीस स्थानक येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला एसीपी सुनील बोंडे, वर्सोवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार, ओशिवरा पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे, दोन्ही पोलीस स्थानकाचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी, वर्सोवा क्षेत्रात सामाजिक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश गिडवाणी, भारत शर्मा उपस्थित होते.

“आपला परिसर आपली जबाबदारी” हा प्रकल्प संकल्प सिद्धी ट्रस्ट मुंबई ही संस्था “सार्वजनिक सुरक्षितता आणि सुरक्षा” ह्या विषयाला अनुसरून सातत्याने  राबवत आहे. मुंबई शहरात २०१७-१८  मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अति संवेदनशील ठिकाणांवर साधारण ५००० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर सुमारे ५०००  कॅमेरे अजून बसवण्याचा प्रस्तावही होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -