मुंबई: पंतप्रधान मोदी यांचा ताफा अडवणारे आंदोलनकर्ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “काँग्रेसचे नेते ज्या बेशरमीने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भात वक्तव्ये करत आहेत हा निर्लज्जेतेचा कळस आहे. इतक्या जुन्या पक्षाचे लोक देशहिताचा विचार सोडून इतका अपरिपक्व विचार करु शकतात हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटते. या मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो.
करोडो लोकांचे आशिर्वाद पंतप्रधान मोदींसोबत आहेत. या आशिर्वादानेच ते लोकांची सेवा करत आहेत आणि यामुळेच त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण मोदींबद्दल वाईट विचार करणारे असे लोक आहेत त्यांच्याकडून भारतीय जनात हिशोब मागणार आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.