Friday, October 4, 2024
Homeदेशपंजाबमध्ये सुरक्षेत चूक; पीएम मोदी राष्ट्रपतींना भेटले, मोठी कारवाई होणार?

पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; पीएम मोदी राष्ट्रपतींना भेटले, मोठी कारवाई होणार?

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षेत चूक झाल्याप्रकरणी आता केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान मोदींनी आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सुरक्षेतील त्रुटींचा ‘फर्स्ट हँड’ तपशील राष्ट्रपतींना दिल्याचे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्दलही राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चूक झाल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

दुसरीकडे, भाजपने या मुद्द्यावरून पंजाबच्या काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. चरणजित सिंह चन्नी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. पंजाबमधील विरोधी पक्षांनीही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीबद्दल एकसूरात निषेध केला आहे. मात्र, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी या प्रकरणी आरोप फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान मोदींना कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, पंजाबमधील घटनेची चौकशी झाली पाहिजे. अखेर एसपीजी पंतप्रधानांना घेऊन जाण्यास का तयार झाली? तिथे पोलिसांची भूमिका काय आहे, याचाही तपास व्हायला हवा. देशाचा पंतप्रधान कोणीही असेल, आज मोदी आहेत, उद्या दुसरे कोणीतरी असेल, पण पंतप्रधानांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -