Monday, June 30, 2025

पंजाबची घटना भविष्यात होऊ नये : उपराष्ट्रपती

पंजाबची घटना भविष्यात होऊ नये : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चूकीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूंनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधत घटनेवर माहिती जाणून घेतली.


पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीवर उपराष्ट्रपती नायडूंनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच आगामी काळात, भविष्यात अशी चूक रोखण्यासाठी सुरक्षा नियम आणि पद्धतीचे पालन कठोरपणे सुनिश्चित व्हावे यासाठी योग्य पाऊले उचलले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपराष्ट्रपती सचिवालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली आहे.

Comments
Add Comment