नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत चालढकल केल्यावरून काँग्रेसविरोधात देशभर प्रक्षोभ माजला आहे. भाजपकडून संपूर्ण देशभरात निदर्शने करताना काँग्रेसच्या पंतप्रधानांविरोधाचा निषेध करण्यात आला.
फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकून पडला. सुरक्षेच्या कारणास्तव मोदींची पंजाब दौरा रद्द करताना माघारी परतण्याला प्राधान्य दिले. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहे. भाजपने पंजाब सरकारसह काँग्रेसवर टीका केली आहे. दुसरीकडे, भारतीय किसान संघाने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या उल्लंघनात आपली भूमिका मान्य केली आहे. पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती त्यांना लीक केली होती, असा दावा भारतीय किसान संघाचे सुरजित सिंह फूल यांनी केला आहे.