मुंबई : म्हाडा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून ७, ८ आणि ९ फेब्रुवारीला या परीक्षा होणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. याबद्दल अधिक माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मिळेल. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्याने म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता नवीन वेळापत्रकानुसार ७, ८, आणि ९ फेब्रुवारीला सकाळी ९ ते ११ दुपारी १२:२० ते २:३० आणि ४ ते ६ अशा वेळेत या तीन दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या परीक्षांसाठी तयारी करावी लागणार आहे.
राज्यातील पेपरफुटी प्रकरणानंतर सर्वच प्रकारच्या परीक्षांच्या नियोजनात मोठा घोळ झाला होता. आरोग्य विभागाच्या, म्हाडाच्या आणि टीईटी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लीक होणे, गुप्तता भंग होणे यांसारख्या गोष्टींमुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये पेपर फोडणारी राज्यातील एक मोठी टोळी समोर आली होती. या प्रकरणात अनेक मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागले.
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…