Thursday, June 19, 2025

'सामी...' या व्हायरल गाण्यावर नऊवारी नेसून थिरकली मानसी नाईक

'सामी...' या व्हायरल गाण्यावर नऊवारी नेसून थिरकली मानसी नाईक
मुंबई : सोशल मिडीयावर कायम चर्चेत असलेली मानसी नाईक ही कायम तिच्या चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ शेयर करत असते. नवीन ट्रेंड असो किंवा नवीन व्हायरल गाणं त्यावर मानसी नाईकचा व्हिडीओ सगळ्यात आधी पाहायला मिळतो. मानसीचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आलाय.

पुष्पा या साऊथ चित्रपटातील सामी सामी हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालय. सोशल मिडीयावर या गाण्यावरील डान्स व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. या गाण्यातील रश्मिकाची डान्स स्टेप देखील चर्चेत आहे. याच गाण्यावर मानसी नाईकनेही डान्स व्हिडीओ केलाय. मानसीच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.
Comments
Add Comment