Tuesday, June 17, 2025

जोहान्सबर्ग कसोटीवर पावसाचं सावट

जोहान्सबर्ग कसोटीवर पावसाचं सावट
जोहान्सबर्ग : भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग (Johannesburg Test) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट दिसतंय. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ उशीरानं सुरु होणार आहे.  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जडं दिसत आहे. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 122 धावांची गरज असून त्यांचे आठ विकेट्स शिल्लक आहेत. तर, हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या 8 विकेट्स मिळवाव्या लागतील, जे थोडं कठीण दिसत आहे.

जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 40 षटकांत 2 विकेट्स गमावून 118 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी केवळ 122 धावांची गरज आहे. यामुळं हा कसोटी सामना निर्णायक वळणावर आहे.  चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असून आफ्रिका उर्वरित 122 धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ विकेट्स घेऊन ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करतील? हे पाहणे रंजक ठरेल.
Comments
Add Comment