Sunday, December 28, 2025

विराटकडून आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

विराटकडून आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
जोहान्सबर्ग : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याची आई सरोज यांना वाढदिवसानिमित्त दक्षिण आफ्रिकेकडून शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने त्याच्या आईसोबत गुरुद्वाराचा एक फोटो शेअर केला आहे. ‘हॅपी बर्थडे माँ’, असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले. विराट आणि त्याच्या आईचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला. यासोबतच सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी विराटच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मैदानाबाहेर विराट त्याच्या मृदू स्वभावासाठी ओळखला जातो. विराटच्या संगोपनात त्याची आई सरोज यांचा मोलाचा वाटा आहे. २००६ मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सरोज यांनी विराटसह विकास आणि मुलगी भावना यांना लहानाचे मोठे केले. विराट हा देशातील आणि जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्याचे फॅन फॉलोइंग मोठे आहे. विराटने सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले तर चाहते त्यावर अनेक प्रतिक्रिया देतात.
Comments
Add Comment