पुणे : कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा कोणतीही पेन किलर गोळी घेऊ नका, असा सल्ला लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकने दिला आहे.
कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशभरात १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. पहिल्याच दिवशी ४० लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली होती.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनविलेली कोवॅक्सिन ही लस देण्यात येत आहे. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे १० कोटी मुले आहेत. १२ वर्षे वयावरील मुलांना कोवॅक्सिन लस देण्यासाठी औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २४ डिसेंबर रोजी सशर्त परवानगी दिली होती.
लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर मुलांना पॅरासिटामॉल किंवा कोणतेही पेन किलर दिली जात नाही, असे भारत बायोटेकने निवेदनाद्वारे म्हटले आहे. काही लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन सोबत पॅरासिटामॉल ५०० एमजी टॅबलेट घेण्यास सांगितले जात असल्याचे निदर्शनास आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काही लसीकरण केंद्रांवर मुलांसाठी कोव्हॅक्सिनसोबत तीन पॅरासिटामॉल ५०० एमजी टॅबलेट घेण्याची शिफारस करत असल्याचा फिडबॅक आम्हाला मिळाला आहे. कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा कोणतीही पेन किलर घेण्याची शिफारस केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ३० हजार जणांवर लसीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यापैकी जवळपास १० ते २० टक्के लोकांमध्ये साईड इफेक्ट्स झाल्याचा रिपोर्ट आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अनेक साईड इफेक्ट्स हे सौम्य आहेत. एक किंवा दोन दिवसांत ते बरेही होतात. तसेच त्यांना औषधांचीही गरज नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लोकांना औषध घेण्याचा सल्ला दिला जातो, असेही त्यांनी म्हटले आहे.
काही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांवर पॅरासिटामॉल घेण्याची शिफारस करण्यात आली होती. परंतु ते कोव्हॅक्सिन ही लस घेतलेल्यांसाठी नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. भारतात सध्या तीन लसींचा वापर केला जात आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या कोरोना प्रतिंबधात्मक लसींचा वापर लसीकरण मोहिमेत केला जात आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…