Wednesday, July 2, 2025

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या साखरपुड्याची चर्चा

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या साखरपुड्याची चर्चा
मुंबई : विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी या दोघांचा गोव्यात साखरपुडा पार पडला असल्याच्या चर्चा मराठी सिनेसृष्टीमध्ये रंगतायत. शिवानीने तिच्या इन्स्टाग्रामवर विराजसबरोबरचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शिवानी अंगठी दाखवतेय. या फोटोमध्ये शिवानी आणि विराजस खूष दिसतायत . या दोघींनी आता 'ऑफिशअली एन्गेज' असल्याचं एकप्रकारे जाहीर केलंय. हा फोटो शेअर करताना शिवानीने कॅप्शनमध्ये लिहलं की, Put a ring on it!#2022 #virani




हा फोटो शेअर होताच  मराठी सेलिब्रिटींनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गौतमी देशपांडे यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी शिवानीने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत अभिनंदन केलं आहे. लगेच शिवानेनेदेखील कमेंट करत सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
Comments
Add Comment