Sunday, October 26, 2025
Happy Diwali

तळोजा कारागृहातील कैद्यांसाठी कोविड लसीकरण शिबीर

तळोजा कारागृहातील कैद्यांसाठी कोविड लसीकरण शिबीर
नवीन पनवेल : जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी दि. ६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पनवेल महानगरपालिका व तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कारागृहात नवीन दाखल झालेल्या कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दाखल २ हजार ८१८ कैद्यांपैकी २ हजार ८१६ कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यापूर्वीच २ हजार १८० कैद्यांना कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिली आहे. यावेळी तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, नायब तहसीलदार संजीव मांडे तसेच पनवेल महानगरपालिकेचे लसीकरण वैद्यकीय पथक उपस्थित होते.
Comments
Add Comment