Monday, August 25, 2025

Corona Updates : केंद्रीय मंत्रिमंडळातही कोरोनाचा शिरकाव; आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोनाबाधित

Corona Updates : केंद्रीय मंत्रिमंडळातही कोरोनाचा शिरकाव; आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोनाबाधित

मुंबई : राज्यातले १२ हून अधिक मंत्री आणि विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झाली असताना आता केंद्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये भारती पवार म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या गृहविलगीकरणात आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांना मी कोरोना चाचणी करून घेण्याचे आणि कोरोनाच प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करते.

दोन दिवसांचा नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार दोन दिवसांच्या नाशिक-मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर खासदार गोडसे यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉ. भारती पवार यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास ७० हून अधिक आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Comments
Add Comment