Saturday, July 5, 2025

Corona Updates : तिस-या लाटेच्या धास्तीने ऑनलाईन विक्रीत वाढ; बाजारातही खरेदीसाठी गर्दी

Corona Updates : तिस-या लाटेच्या धास्तीने ऑनलाईन विक्रीत वाढ; बाजारातही खरेदीसाठी गर्दी

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या तिस-या लाटेच्या धास्तीने लोकांनी ऑनलाईन खरेदीवर भर दिला असून अत्यावश्यक सामान व वस्तू खरेदीसाठी बाजारातही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते.


कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने होत असलेली वाढ सर्वांसाठी चिंताजनक बनली आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्यामुळे बाजारात खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


स्टोअर शेल्फ आणि ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरुन गरजेच्या वस्तू गायब झाल्या आहेत. दररोजच्या वापरात असणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची ऑनलाईन विक्री मागील ७ दिवसांत १५ टक्क्यांनी वाढली आहे. कोरोना रुग्ण वाढू लागल्याने बाजारात जाण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंगवर लोकांनी भर दिला आहे. त्याचसोबत दुकानांच्या वेळेवर घालण्यात आलेले निर्बंधही ऑनलाईन खरेदीसाठी फायदेशीर ठरले आहेत. दिल्लीत तर ऑड इवन आधारावर ८ वाजेपर्यंत मार्केट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन खरेदी वाढली आहे.


सर्व प्रकारच्या वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीत १५ टक्के वाढ झाली आहे. बिस्किट, चॉकेलट, पेय, साबण, शॅम्पू, खाण्यापिण्याच्या वस्तू यांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे. सॅनेटायझर, एन९५ मास्क यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमधून धडा घेत ई कॉमर्स कंपन्यांनी यावेळी पहिल्यापासून तयारी केली असून मोठ्या प्रमाणावर साठा केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा