Thursday, January 15, 2026

Corona Updates : आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’

Corona Updates : आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’

मुंबई : राज्यात आतापर्यंत ९ हजार ५१० पोलिस कर्मचाऱ्यांना तर गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने राज्याचे गृहखाते सतर्क झाले आहे.

राज्यात मुंबई पुण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने घेरले आहे. राज्यात आतापर्यंत ९ हजार ५१० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ”आपण ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचे आहे”. तसेच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment