Saturday, June 21, 2025

कोरोनामुळे ग्रॅमी अवॉर्डला स्थगिती

कोरोनामुळे ग्रॅमी अवॉर्डला स्थगिती

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रॅमी अवॉर्ड 2022 पुढे ढकलण्यात आला आहे. 64 वा ग्रॅमी अवॉर्ड अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणार होता. मात्र, कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे. ''रेकॉर्डिंग अॅकॅडमीने’ने याबाबत माहिती दिली आहे.

शहरातील-राज्यातील संबंधित अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थासोबत चर्चा करून 64 वा ग्रॅमी अवॉर्ड पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक, पाहुणे, कर्मचारी यांचे आरोग्य सर्वप्रथम आहे. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments
Add Comment