नवी दिल्ली: केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने मासिक पीडीआरडी, म्हणजेच कराच्या हस्तांतरणानंतरची महसूली तूट भरुन काढण्यासाठी म्हणून १७ राज्यांना ९,८७१ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. पीडीआरडी अंतर्गत राज्यांना देण्यात येत असलेल्या रकमेचा हा दहावा हप्ता आहे.
आयोगाने १७ राज्यांना हा निधी देण्याची शिफारस केली होती. ज्या राज्यांना हा निधी देण्याची शिफारस आयोगाने केली आहे, त्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
आतापर्यंत, पात्र राज्यांना, पीडीआरडी अंतर्गत, चालू आर्थिक वर्षात ९८,७१० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. या महिन्यात वितरित करण्यात आलेल्या निधीची तसेच पीडीआरडी अंतर्गत२०२१-२२ या वर्षात राज्यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या निधीची राज्यनिहाय माहिती सोबत जोडली आहे. राज्यघटनेच्या कलम २७५ अंतर्गत, राज्यांना पीडीआरडी –म्हणजेच कर हस्तांतरणानंतरची महसूली तूट भरुन काढण्यासाठीचा निधी दिला जातो. कर हस्तांतरणानंतर, राज्यांना महसूलीउत्पन्नात निर्माण झालेली दरी भरुन काढण्यासाठी, पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार हा निधी दिला जात आहे.