'बुली बाई'ऍप तयार करणाऱ्यास आसामहून अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने ‘बुली बाई’ऍप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला आसाम येथून अटक केली आहे. डीसीपी केपीएस मल्होत्रा यांच्या पथकाने ही अटक केली आहे. या आरोपीचं नाव नीरज असून हा गिथहब वरून अॅप बनवणारा मुख्य आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नीरजने बुली बाईला गिथहब अॅपद्वारे बनवले होते.

नीरज हा गिथहबवर बुली बाई अॅप तयार करणारा हा मुख्य आरोपी आहे. आरोपी नीरज बिश्नोई हा सुमारे 21 वर्षांचा आहे. यापूर्वी, दिल्ली महिला आयोगाने 'बुली बाई' आणि 'सुली डील' अॅप्सवरील आक्षेपार्ह सामग्रीच्या चौकशीच्या संदर्भात या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली पोलिसांना हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्ली महिला आयोगाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 'गिटहब' अॅपवर अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय अपलोड केल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेतली. आयोगाने दिल्ली पोलिसांना हजर राहून 'सुली डील' आणि 'बुली बाई' प्रकरणात अटक केलेल्यांची यादी करण्यास सांगितले.

दिल्ली महिला आयोगाने जारी केलेल्या आवेदनात म्हणले आहे की, अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे अस्वस्थ करणारे आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींच्या या भूमिकेमुळे महिला आणि मुलींची ऑनलाइन विक्री आणि इतरांना शिक्षा झालेल्यांचे मनोबल वाढले आहे. काही अज्ञात लोकांच्या गटाने 'गिटहब' वापरून शेकडो मुस्लिम महिला आणि मुलींचे मॉर्फ केलेले फोटो एका अॅपवर अपलोड केले आहेत आणि ते 'बुली डील ऑफ द डे' म्हणून शेअर केले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत