Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीभिवंडीत भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड

भिवंडीत भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड

मोनिश गायकवाड

भिवंडी : भिवंडी तालुक्यात सध्या दुगाडफाटा येथील एकमेव भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.
दुगाडफाटा येथील भातखरेदी केंद्रावर तब्बल २२०० शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत ६५० शेतकऱ्यांचे १६ हजार क्विंटल भात खरेदी केल्याची माहिती गोदाम व्यवस्थापक लहू घोडविंदे यांनी देत ३१ जानेवारीपर्यंत भात खरेदीस शासनाने परवानगी दिल्याने या काळात आपला भात विक्री होणार नाही, या भीतीने शेतकरी भात घेऊन केंद्रावर दाखल होत आहेत, अशी महिती घोडविंदे यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील कांबे, जू नांदूरखी, पडघा, बापगाव, लोनाड, अंबाडी, दिघाशी, चिंबीपाडा या भागात आजही मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात असून त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देऊन भात खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर खरेदीविक्री महासंघास शेतकऱ्यांना कडील साधारण प्रतीचा भात १९४० रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊन ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला असताना भिवंडीत भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.

तालुक्यातील हिवाळी शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी सोसायटी लि. व झिडके येथील जय किसान भात गिरणीच्या झिडके व पडघा अशा तीन ठिकाणी या दोन सहकारी संस्थांना भात खरेदीसाठी खरेदी-विक्री संघाने मान्यता दिली असून झिडके पडघा येथील गोदामांची क्षमता कमी असल्याने तेथील भात खरेदी बंद असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दुगाडफाटा येथे वळविल्याने या ठिकाणी खरेदी केलेला भात साठवणुकीची सुद्धा गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -