मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरूवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतले आहे/
तसेच त्यांचा जवाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी सायबर सेलच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जितेन गजारिया यांनी केलेले दोन्ही ट्विट हे कायद्याच्या चौकटीत आणि सभ्य भाषेतील आहेत. त्यामध्ये कोणत्याही आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला नाही. त्यामुळे आम्ही यापुढेही सभ्य भाषेत राजकीय ट्विट करत राहू.
रश्मी ठाकरे यांना ‘राबडीदेवी’ म्हटले, तर काय झाले? राबडीदेवी या बिहारच्या मुख्यमंत्री होत्या. मग रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हणण्यात काय चूक आहे?, असा सवाल जितेन गजारिया यांच्या वकिलांनी उपस्थित केला.