Thursday, July 10, 2025

Corona Updates : देशात २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ तर ओमायक्रॉनचे २६३० नवीन रुग्ण

Corona Updates : देशात २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ तर ओमायक्रॉनचे २६३० नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०, ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या ७ महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९१,८४९ रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या २४ तासांत १९,१५२ जण बरे झाले आहेत.


https://twitter.com/ANI/status/1478937359026561027?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478937359026561027%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fcorona-in-india-e0a497e0a587e0a4b2e0a58de0a4afe0a4be-24-e0a4a4e0a4bee0a4b8e0a4bee0a4a4-90-e0a4b9e0a49ce0a4bee0a4b0-928-e0a495e0a4b0e0a58b%2F

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजार ४०१ वर पोहचली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ हजार ८७६ झाली आहे. याशिवाय काल १९ हजार २०६ लोक कोरोनातून बरे झाले. तर आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ४११ हजार ९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. मात्र देशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.४३ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० वर पोहचली


देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० इतकी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे एकूण ७९७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३३० जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत ओमायक्रॉनचे ४६५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ जण बरे झाले आहेत. देशातील ओमायक्रॉनच्या २६३० रुग्णांपैकी ९९५ जण बरे झाले आहेत.


Comments
Add Comment