Monday, October 27, 2025
Happy Diwali

सोनू निगमसह पत्नी, मुलगा, मेहुणीला कोरोनाची लागण

सोनू निगमसह पत्नी, मुलगा, मेहुणीला कोरोनाची लागण

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत त्याची पत्नी, मुलगा आणि मेहुणीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

सोनू निगमने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की- तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी यावेळी कोविड पॉझिटिव्ह आहे. काही लोकांना माहित आहे आणि अनेकांना नाही. पण मी कोविड पॉझिटिव्ह आहे असे मला वाटत नाही, हे खरे आहे. मी दुबईत आहे. मला भुवनेश्वरमध्ये परफॉर्म करायचे होते आणि सुपर सिंगर सीझन ३ चे शूटिंगही करायचे होते. जाण्यापूर्वी माझी कोरोना चाचणी करावी लागली आणि मी कोविड पॉझिटिव्ह आलो. मला आशा आहे की मी लवकरच बरा होईल. मी किती वेळा व्हायरल, गळा खराब असताना कॉन्सर्ट केले आहे? यापेक्षा हे खूप चांगले आहे. पण मला त्यांचे वाईट वाटत आहे ज्यांना माझ्यामुळे नुकसान झाले आहे.

काम पुन्हा ठप्प होत असल्याचे मला वाईट वाटत आहे. तो खूप वेगाने पसरत आहे. मला चित्रपटगृहे आणि चित्रपटाशी संबंधित लोकांचे वाईट वाटते कारण काम नुकतेच सुरू झाले होते. गेल्या २ वर्षांपासून सर्व काही बंद होते, परंतु मला आशा आहे की सर्व काही लवकरच ठीक होईल.

सोनू निगम पुढे म्हणाला की, मी माझ्या मुलाला निवानला भेटण्यासाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने दुबईला आलो होतो. पण आता मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझी पत्नी मधुरिमा, माझा मुलगा आणि माझ्या पत्नीची बहीण एकत्र आम्ही सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आहोत. आम्ही आनंदी कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब आहोत.

Comments
Add Comment