नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, हजारो लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, समाजासाठी त्यांनी केलेल्या या उदात्त सेवेबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल, असे म्हटले आहे.
डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकले आहेत. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्येही खूप काम केले. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असे ट्विट् करत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1478423788416946176?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478423788416946176%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fsindhutais-work-is-too-big-for-the-neglected-prime-minister-modi-expressed-his-condolences%2F