Friday, July 4, 2025

व्हिडिओ पाहून नेटिझन्स झाले भावूक

व्हिडिओ पाहून नेटिझन्स झाले भावूक

राजस्थान : मुक्या जीवांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून त्या अनेकदा दिसतात. राजस्थानच्या कुचेरा भागात राहणाऱ्या एका मोराच्या जोडीमधील एकाचा मृत्यू झाला.


गावातले काही नागरीक या मृत मोराला घेऊन जात होते.. मात्र त्यावेळी त्याच्या जोडीदारानं या माणसांचा पाठलाग सुरू केला. जणू काही जोडीदाराच्या अंत्ययात्रेत तो सहभागी होता..


वन विभागातील अधिकारी परवीन कसवान यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे नेटिझन्सही हळहळले.

Comments
Add Comment