Sunday, December 21, 2025

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण

मुंबई : भाजपा नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.

दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.

Comments
Add Comment