Thursday, October 23, 2025
Happy Diwali

औरंगाबादमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

औरंगाबादमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
औरंगाबाद :राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढलेल्या पत्रकानुसार, जिल्ह्यातील तहसील कार्यलाय, पंचायत समिती कार्यालय,आरोग्य कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य लिखित स्वरुपात देण्याच्या सूचना सुध्दा यावेळी देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे. तसेच शहरप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >