Friday, July 19, 2024
Homeटॉप स्टोरीमुंबईकरांसाठी दुसरा आठवडा काळजीचा

मुंबईकरांसाठी दुसरा आठवडा काळजीचा

पुन्हा खासगी कर्मचारी भरणार

मुंबई : सध्या मुंबईत रोज कोरोना रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या आणखी वेगाना वाढणार आहे. त्यामुळे दुसरा आठवडा मुंबईकरांसाठी काळजीचा असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असून पुढील चार दिवसांतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मुंबईतील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे दिवसाला २५ हजार रुग्णांसाठी पालिकेने तयारी ठेवली आहे. यात बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. २९ डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढत असून दररोज होणारी रुग्णवाढ ही सुमारे २० ते ३० टक्क्यांपर्यंत असेल, असा इशारा आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिला आहे.

पुन्हा कर्मचारी भरणार

रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर आरोग्य सेवेवर ताण येऊ नये म्हणून पालिका डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी स्टाफ खासगी कंत्राटी पद्धतीने भरती केला जाणार आहे.

८९ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

दररोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसून फक्त ५ टक्के बाधितांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर रुग्णसंख्या वाढल्यानंतर १० टक्के रुग्ण दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणही जास्त आहे. तर १ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.

८२ टक्के बेड्स रिक्त

मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे ८२ टक्के बेड्स रिक्त आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली तर गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. जवळपास १ लाख बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -